!!!लाईक/कमेंट मारायच्या अगोदर १० वेळा विचार करा!!!
विषय फार वेगळा आहे.
___________________________
अभ्यासावीन शहाणपण नाही...
___________________________
हा लेख कोणत्याही देवतेच्या समर्थनार्थ किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात , लिहिलेला नाही तर हा लेख त्या मानसिकतेविरुद्ध लिहिला आहे, ज्याद्वारे सतत अर्धवट ज्ञानाच्या आधारे, हिंदू देवतांना, आणि हिंदू धर्माला टार्गेट केले जाते.
काही दिवसांपूर्वी कुठेतरी वाचले, <<<<ब्रह्माने ६० हजार ऋषी पैदा करण्याकरता किती टँकर वीर्य वापरले, शी किती घाणेरडी आहे आपली संस्कृती, किळस येते, कसल्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत वगैरे .. >>>> वाचून वाईट वाटलं. विचार केला, विकी डोनर सारख्या चित्रपटात जेव्हा क्लायमॅक्स मध्ये, नायकाच्या वीर्यापासून तयार झालेली शेकडो मुलं बागेत खेळताना दाखवली जातात तेव्हा मात्र आम्ही शिट्ट्या मारून नायकाचे कौतुक करतो, तिथं घाण का वाटत नाही? किळस देखील वाटत नाही! चित्रपट हिट होतो!!!!
याशिवाय देखील अनेक फेसबुक आयडी आहेत, जे रात्रंदिवस करोडो हिंदूंच्या श्रद्धास्थाने असलेल्या अशा देवतांवर गरळ ओकताना नेहमी दिसतात. (यांचा मुख्य उद्देश समजल्या नंतर अनेकांना मी मित्र यादीतून काढून टाकले आहे.)
पुराणातील, स्त्री-पुरुष लैंगिक संबंधांवर समाजात, आज क्वचितच इतक्या उघडपणे लोक आपले विचार मांडतात. विषय नाजूक आहे. विचार मांडले तरी कुठेतरी फेक आयडी बनवून काम चालू असते. कुठेतरी भिडे खातर, जग काय म्हणेल, हसं होईल, इमेजला धक्का बसेल, म्हणून आम्ही अशा अनेक विषयांवर घरात, बाहेर, कामाच्या ठिकाणी बोलतच नाही. पण मनात प्रचंड उत्सुकता मात्र असते. मग असे विषय अगदी खास अशा मित्र-मैत्रिणींच्यात निघतात. पण त्यातून परिपूर्ण माहिती मिळेलच असे नाही, किंवा एकतर्फी माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते.
या आजच्या सामाजिक परिस्थितीचा फायदा उचलून काही लोक, अशा पुराणकथांमध्ये वर्णिलेल्या, स्त्री-पुरुष संबंधांवर लिहिल्या गेलेल्या कथांवर ताशेरे ओढताना दिसतात. त्यांची थट्टा करतात. मग त्यामध्ये हिंदू संस्कृती कशी वाईट आहे, या विविध कथा कशा भंपक आहेत, त्यामध्ये वर्णिलेल्या गोष्टी कशा मूर्खपणाच्या आणि पाणचट आहेत, याचे वर्णन हे लोक करतात. त्यांना आपल्यापैकी अनेक जण वा! किती छान विचार म्हणून लगेच लाईक ठोकून अनुमोदन देखील देतात.
खरंतर महाराष्ट्राच्या १३ कोटी लोकसंख्येपैकी काहीच लोक फेसबुक वापरतात, काहीच ब्लॉग्स वाचतात, आणि काहीच जण whatsapp वापरतात. आज जरी अशा लोकांची किंवा त्यांनी लिहिलेल्या पोस्ट्स ची काळजी करण्याची गरज नसली तरीही अशा विषयांवर योग्य संदर्भ देऊन वेळोवेळी मत मांडून नाण्याची दुसरी बाजू लोकांच्यासमोर ठेवणे मला योग्य वाटते.
________________________________
विषय एकदम सरळ नाही, त्याचे अनेक पैलू आहेत.
सर्व प्रथम पाहूया देव म्हणजे काय?
आपण गेली अनेक वर्षे टीव्ही च्या माध्यमातून देवाला भेटत आहोत. त्यात देव अनेक चमत्कार करताना आपण पाहिला आहे, आणि आपल्या मनात नकळत कुठे तरी, देव म्हणजे असाच असला पाहिजे, ही पक्की धारणा तयार झाली आहे.
[या धारणेचा मी पूर्ण आदर करतो. यामुळे समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा संदेश देण्यात येत असेल तर, मला यात काहीच वावगं वाटत नाही.]
परंतु माझी देवाची संकल्पना थोडी वेगळी आहे, आणि त्यावर काही दिवसांपूर्वी डॉ. पी. व्ही. वर्तकांचे 'दास मारुती? नव्हे वीर हनुमान' पुस्तक वाचल्यानंतर शिक्कामोर्तब झाले. या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे देव म्हणजे आपले पराक्रमी, आणि ज्ञानी महापुरुष! त्यांची नंतर पूजा अर्चा सुरु झाली असेल, कर्मकांड आली असतील तर तो वेगळा विषय आहे, पण देवाची व्याख्या मात्र मला एकदम पटली.
भारतात व्यक्तिपूजेला महत्त्व आहे. गौतम बुद्धाने निरीश्वरवाद मानला तरी देखील, अनेक बुद्धिवादी गौतम बुद्धाचीच पूजा करताना आपल्याला दिसतात. जसे आपल्याकडे व्यक्तिपूजा आहे तशीच चीनमध्ये पूर्वजपूजा आहे. आपल्याकडे आपल्या पराक्रमी आणि सामर्थ्यशाली पुरुषांना देव मानलं जातं तसेच चीनमध्ये या पूर्वजांची पूजा केली जाते, तिकडे पूर्वज पूजेला महत्त्व आहे.
समाजात निर्माण होणारे देव, या विषयावर अधिक डोकं घासत असताना जाणवलं, राम-कृष्ण देखील महापुरुषच होते, परंतु त्यांच्या अनुयायांनी त्यांना देव बनवलं. मग हजारो वर्षांनी आजच्या लोकांना वाटायला लागले की छे! हे कसले देव हा तर शुद्ध खोटारडेपणा! असं कधी घडलंच नव्हतं, यात विशिष्ट समाजाचा फायदा आहे. मग देव ही माणसाची गरज तर आहेच, किती नाही म्हटले, किती नास्तिकवादी गरळ ओकणारे संदेश सोशल मिडिया वरून पसरवले तरीही, प्रत्येकाची कोणत्याना कोणत्या देवावर/व्यक्तीवर/विचारांवर आस्था असतेच, आणि अशी आस्था/श्रद्धा असणे म्हणजेच आस्तिक्य, किंवा आस्तिकवाद होय. विज्ञानावर श्रद्धा असणे हा देखील एक प्रकारचा आस्तीकवादच आहे नै? मग आपली श्रद्धा असलेले देव कसे उत्कृष्ट आणि पुराणातले कसे निकृष्ट हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली, आणि त्यातून या पुराणातील देवांवर अश्लाघ्य भाषेत टीका, वाट्टेल त्या उपमा देणे आणि त्यांचा अपमान करणे, असले उद्योग सुरु झाले.
आता AIB ची संस्कृती फोफावली असल्याने काही लोकांना त्यात गैर वाटत नाही, कारण या संस्कृतीत तर आपल्या आईबापाने कशा रात्री गमती जमती केल्या त्यातून कसे आपण पैदा झालो यावर अनेक पाणचट विनोद मोठ्या व्यासपीठावर उघडपणे मारले जातात. त्यामुळे जिथे आपल्या आई-बापाची ठेवली जात नाही, तिथे हजारो वर्षांपूर्वीच्या कर्तुत्ववान पूर्वजांची लाज कशी काय ठेवली जाणार? असो.
एक उदा. देतो, आपण सर्वच लहानपणी, बिना चड्डीचे फिरलो, हसलो, रडलो, पौगंडावस्थेत असताना अनेक मुलींची स्वप्ने पाहिली, हस्तमैथुन केले, या गोष्टी एखाद्याने केल्या नसतील तरच नवल! ती व्यक्ती Abnormal/ Unique आहे, असे म्हणावे लागेल. यावर स्वतःचे कौतुक करण्याचे, अभिमान वाटून घेण्यासारखे, वाईट वाटून लाज बाळगण्यासारखे, किंवा किळस वाटण्यासारख काहीच नाही. जे बाकी ४ आजूबाजूच्या मुला-मुलींनी केले तेच तुम्ही-आम्ही देखील केले.
अगदी अशाच पद्धतीने, आपल्या समाजाने देखील अनेक बदल पाहिलेत. रानटीपणाकडून मनुष्य प्राणी अधिकाधिक प्रगल्भ, आणि सुसंस्कृत बनत गेला. जसे बाकी कळपात राहणारे प्राणी वागतात, उदा. सिंह, हत्ती इ. आपल्याच कुटुंबातील सदस्यांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, अगदी त्याच प्रमाणे मनुष्य प्राण्याने देखील केले. त्याला त्या वेळी, आई, वडील, भाऊ, बहिण या नात्यांची समज देखील नव्हती. जसे २०-२२ सिंहिणी आणि त्यांच्यासाठी १-२ सिंह एका कळपात राहतात त्याचप्रमाणे, हजारो वर्षांपूर्वी एक सामर्थ्यशाली पुरुष आणि अनेक स्त्रिया एकत्र राहिलेले संदर्भ 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकात दिलेले आहेत.
(पुस्तकातील ४ थे प्रकरण वाचताना पोटात गोळा यायची पूर्ण शक्यता आहे, त्यासाठी अगोदर 'कामसूत्र' वाचले असेल तर त्रास कमी होईल, तेव्हा जपून!!! –
'कामसूत्र' पुढील दुव्यावरून डाऊनलोड करा - http://goo.gl/vwPt3o
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक इथून डाऊनलोड करा - https://goo.gl/wYp5wg)
बर या चालीरीती फक्त भारतात होत्या का? तर नाही !!!!! या चालीरीती आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, युरोप, अशा विविध देशांमध्ये म्हणजेच जगभर होत्या याचे संदर्भ या पुस्तकात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याच भूतकाळातील रुपाकडे पाहून लाज वाटून घेण्यासारखे/किळस वाटण्याजोगे काहीच नाही. ही आजच्या समाजाच्या जडणघडणी मधली एक अवस्था आहे, इतकी साधी आणि सरळ गोष्ट आहे.
आजचं साहित्य वाचायला घेतलंत, तर आजच्या समाजाची छाप त्यावर दिसून येते. उदा. आजच्या गोष्टींमध्ये मोबाईल्स, Gadgets, संगणक, कार, बाईक, इंटरनेट, तसेच विवाहबाह्य संबंध, महिलांवरचे अत्याचार, दहशतवाद अशा एक ना अनेक गोष्टींचा उल्लेख सहज सापडतो, मग हजारो वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन जर तत्कालीन साहित्यात होत असेल तर त्यात गैर काय? लपवून ठेवणे, ही आपली संस्कृती नाही, उघड सकारात्मक चर्चा ही आपली संस्कृती आहे.
आता खास ब्रह्माबद्द्लच बोलायचं असल्यास, हिंदू मान्यता लक्षात घ्याव्या लागतील. हिंदू मान्यतेप्रमाणे, ब्रह्मा-विष्णू-महेश या अनुक्रमे सर्जन-संरक्षण-संहार याचं प्रतिक आहेत. हे तिन्ही गुण मानवातच असतात. पुरुषामध्ये ब्रह्म पुरूषबीजाच्या तर स्त्रीमध्ये तो स्त्री बीजाच्या रुपात वास करतो. ब्रह्माने ६०००० ऋषी निर्माण करण्यासाठी त्याला हजारो स्त्रियांशी संबंध ठेवावे लागतील, जे व्यवहारिक दृष्ट्या कुणालाच शक्य नाही, मग अशा कथांच्यामागे काय अर्थ असावा? तर ब्रह्मा ही सृष्टीच्या निर्मितीची देवता आहे, सर्व सृष्टी, अगदी गवताच्या पात्यापासून, ते मानवापर्यंत ब्रह्मानेच बनवली आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे, आणि याच श्रद्धेतून ६०००० ऋषींची कथा आली असावी. अशा अनेक कथा, पोथ्या-पुराण, धर्मग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत अधिक रंजक पद्धतीने प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी काहीवेळा त्यात अतिशयोक्ती येते, काहीवेळा त्यात रूपककथा जोडल्या जातात, पण आपण त्यातील भावार्थ घेणे अधिक उचित ठरेल.
काही उदा. देतो, [अतिशय सौम्य दिलेली आहेत, अश्लाघ्य म्हणींची उदाहरणे दिली नाहीत] नाचता येईना अंगण वाकडं, अडला हरी गाढवाचे पाय धरी, काखेत कळसा गावाला वळसा अशा जेव्हा म्हणी आपण वापरतो तेव्हा खरोखर अंगण वाकडे असते का? किंवा काखेत कळशी घेऊन माणूस गावाला वळसा घालतो का? किंवा परमेश्वर कधी गाढवाचे जाऊन पाय धरतो का? सो कॉल्ड बुद्धिवाद्यांना जर अशा कथांमधला भावार्थ समजत नसेल, हा खरा बुद्धिवाद समजत नसेल, तर यांच्या बुद्धीला, यांच्या ज्ञानाला, आणि यांच्या अभ्यासाला काय चाटायचंय?
शेवटी इतकेच म्हणीन, आपले राष्ट्र, आपला धर्म, आपले देव, आपली संस्कृती, आपली भाषा, आपला समाज, या सर्व गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत, आपल्या वैयक्तिक अजेंड्यासाठी, ४ फुटकळ लाईक आणि कमेंट्स साठी मज्जा बघत बसाल तर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंच्या हातात आयते हत्यार देत आहात हे लक्षात ठेवा.
जो भारतीय सैनिक, जय भवानी, हरहर महादेव सारख्या घोषणा देऊन शत्रूवर तुटून पडतो, या घोषणा दिल्याकी त्याच्या अंगात १२ हत्तीचं बळ येतं, ती श्रद्धा तोडायचा प्रयत्न कुणी करू नये, एवढीच अपेक्षा.
कोणत्याही साहित्यकृती, ग्रंथ, पुराणकालीन किंवा वर्तमानकालीन, त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले विचार, आणि तसेच अवतारी पुरुषांनी किंवा स्मृतीकारांनी जे विचार लोकांच्या समोर मांडले आहेत , तत्वज्ञान मांडले आहे त्याचा पाया संपुर्णपणे तात्कालीन समाज व्यवस्था, रूढी, आणि परंपरा हाच असतो. कालाप्रमाणे समाजव्यवस्थेत सातत्याने बदल घडत राहतात त्यामुळे तत्कालीन साहित्याला आणि तत्वज्ञानाला नावे ठेवण्यात अर्थच नाही, तसेच या लेखाद्वारे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली मानवी संस्कृती, आणि त्याचा समकालीन साहित्यावर पडलेला प्रभाव अधोरेखित करणे हाच एकमेव उद्देश आहे. कोणत्याही कालबाह्य रुढींचे समर्थन अजिबात नाही.
- Suchikant@gmail.com

No comments:
Post a Comment